मराठी कविता संग्रह

कदाचित

02:30 Sujit Balwadkar 1 Comments Category : ,

सरेल एवढा प्रहर कदाचित
तुला पडेलही विसर कदाचित

पुन्हा कधीतरी समीप येता
तुझी वळेलही नजर कदाचित

समोरुनी तुझ्या निघून गेलो...
(तुला नसेल ही खबर कदाचित! )

करेल शांत या मनास आता
तुझ्या कुपीतले जहर कदाचित

अजून मी बजावतो मनाला-
नसेल उंच ते शिखर कदाचित....

बुजेल एक एवढी जखम अन्
बनेल पूर्ववत् शहर कदाचित

- कुमार जावडेकर

RELATED POSTS

1 अभिप्राय