हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
अगं रानी थांब मर्दिनी त्वांड फिरवुनी जाऊ नको ग
अंगत पंगत सांगतो गंमत मारक्या म्हशीगत बघु नको ग
अगं माझ्या रानी गं ...
अहो सरकार स्वारी आली दारी तुकडा वोवाळुन टाकू का रं
अन् उजेड पडलाय् तुमचा म्हणुनी या सुर्व्याला झाकन झाकू का रं
अरं माझ्या राजा हे ...
अगं साता नवसानं नवरा मिळला तरी बि उडतीस तीनताड गं
अन् दुस-या देखत निंदा नव-याची बायको हायेस का भित्ताड गं
अगं माझ्या रानी गं ...
आरं आपल्या त्वोंडानं कौतुक करिशी वांगी सोलून नाकानं रं
अन् थरथर कापत लगीन केलंस आई बापाच्या धाकानं रं
अरं माझ्या राजा हे ...
अगं वडील मंडळी पुढं दावला नम्रपणा मी लाखाचा
पर उभ्या गावाला माझा दरारा, दादा हाय मी लोकांचा !
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
ह्यांनी रुपयं दिलंतं पंधरा नि ह्यांच्या अंगात नव्हता सदरा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
रुपयं राहिलं चौदा नि ह्यांच्या घरात नव्हता सौदा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
आता रुपयं राहिलं त्येरा अन् ह्यांच्या न्हाणीत फुटका डेरा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
अहो रुपयं राहिलं बारा अन् ह्यांच्या भनीला नव्हता थारा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
अहो रुपयं राहिलं अकरा नि ह्यांच्या मेव्हणीचा भारी नखरा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
आता दहाची राहिली नोट नि ह्यांच्या घरात नव्हतं ताट
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
आता रुपयं राहिलं नऊ नि मागल्या दारानं आली जाऊ
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
आता रुपये राहिले आठ अन् पडली माह्या दिराची गाठ
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
आता रुपये राहिले सात न् ह्यांच्या घरात नव्हतं जातं
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
आता रुपये राहिले सहा नि पोलिस पाटलाला पाजला चहा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
अहो रुपये राहिले पाच नि ह्यांच्या आरशाला नव्हती काच
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
आता रुपये राहिले चार अन् फुडल्या सोप्याचं मोडलंय दार
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
अहो रुपये राहिले तीन नि ह्यांच्या आईचं आला फोन
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
अहो रुपये राहिले दोन नि ह्यांच्या त्वोंडाला आली घान
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
आता रुपया राहिला एक नि म्या हा दत्तक घेतलाय ल्येक
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - कृष्णा कल्ले, बालकराम
चित्रपट - केला इशारा जाता जाता (१९६५)
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
[youtube http://www.youtube.com/watch?v=wafgAIEDJv0&hl=en&fs=1]
0 अभिप्राय