मराठी कविता संग्रह

तुमचं काही...माझं काही

23:35 Sujit Balwadkar 0 Comments Category : ,

मी वेगळ्या लहरीत कविता करतो
तुम्ही वेगळ्याच लहरीत कविता वाचता
मी माझे विचार कवितेत भरतो
तुम्ही तुमच्या जिवनाशी संदर्भ शोधता
मी माझ्या स्वार्थासाठी कविता करतो
तुम्ही कवितेला तुमचा अर्थ देता

म्हणूनच म्हणतो की,

मी एकांतात कविता करतो
तुम्ही एकांतातच वाचाव्या
एकांतात वाचता वाचता
वेग-वेगळ्या अंगाने पहाव्या

माझ्या कविता आहेत,
विचारांकडे जाण्याचे विमान....यात बसाल का?
या आहेत,
न संपणारी दलदल....यात फसाल का?

आहेत कविता दुरध्वनिसारख्या,
आवाज ऐकू येतो पण
विचार कळतातच असे नाही
शब्द हलके-जड कळतात
भावनांचा उतार-चढाव कळतोच असे नाही

शेवटी काय....भाषा सोडा,
विचारांकडे तेवढे लक्ष द्या
मला तसे कमीच समजते
तुम्ही मात्र समजून घ्या!

RELATED POSTS

0 अभिप्राय