मराठी कविता संग्रह

तुझे नी माझे नाते काय?

21:43 सुजित बालवडकर 3 Comments Category :

तुझे नी माझे नाते काय? …
तु देणारी मी … मी घेणारा
तु घेणारी … मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय ?….
तुझे नी माझे नाते काय? …
सुखदु: खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय? …
नात्याला या नकोच नाव
दोघान्चही एकच गाव!
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघान्मधले काही!
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसयाचा पाय?
तुझे नी माझे नाते काय? …

- संदिप खरे

RELATED POSTS

3 अभिप्राय