मराठी कविता संग्रह

बरे नाही!

00:19 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही

ऐक तू ज़रा माझे...सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही

आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही

कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता...
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही

मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही...

- एल्गार, सुरेश भट

RELATED POSTS

0 अभिप्राय