मराठी कविता संग्रह

मी फसलो म्हणुनी हसू दे वा चिडवू दे कोणी

00:05 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

मी फसलो म्हणुनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळंच होती वेडी अन्‌ नितांत लोभसवाणी

ती ऊन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती अन्‌ झाड मारवा होते !

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा आवरोह
भरभरून यायचे तेव्हा त्या कृष्ण नयनीचे डोह
डोहात तळाशी खोलवर्तमान विरघळलेले
शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
का गंधीत गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही !
ती लाल-केशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून गेल्यावरही बघ ओंजळ होती ओली !

- नेणिवेची अक्षरे, संदीप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय