मराठी कविता संग्रह

स्मरशील गोकुळ सारे

16:17 Sujit Balwadkar 1 Comments Category :

स्मरशील राधा, स्मरशील यमुना
स्मरशील गोकुळ सारे,
स्मरेल का पण, कुरुप गौळण
तूज ही बन्सीधरा रे ॥ ध्रु ॥

रास रंगता नदीकिनारी, उभी राहिले मी अंधारी
नकळत तुजला तव अधरावर, झाले मी मुरली रे ॥ १ ॥

ऐन दुपारी, जमीन जळतां, तू डोहावर शिणून येता
कालिंदीच्या जळात मिळुनी, धुतले पाय तुझे रे ॥ २ ॥

मथुरेच्या त्या राजघरातुन, कुंजवनी परतता तूझे मन
[ adsense ]
[slider title="अधिक माहिती"]

अधिक माहिती


गायक/गायिका: फैयाज

संगीतकार: डॉ. वसंतराव देशपांडे

गीतकार: वि. वा. शिरवाडकर

चित्रपट: नाटक : वीज म्हणाली धरतीला

अधिक टिपा: झाशीच्या राणीच्या उठावावर हे नाटक होते. प्रमुख भुमिकेत सुधा करमरकर असत.

[/slider]

RELATED POSTS

1 अभिप्राय