मराठी कविता संग्रह

प्रेम नाही;

16:10 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यानमधील रक्त
ओल्या आठावनिंचे काही क्षण हवे असतात
चाकोरिला उध्वस्ताचे घन हवे असतात....

तसे काही चेहेर्यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी हसनार्यांचे हसने वेगले दिसते!
ओठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा
हवी असते षडाजासारखी सलग, शांत व्यथा.........

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते
मनासाठी मनी एक आर्त हवे असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरान्मधाल्या श्रुति
प्रेम नाही, हवी असते मला चवथी मिति!...

प्रेम नाही दु:खासाठी तारण हवे असते
स्वत:वरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वथाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखल पश्चाताप!

- नेणिवेची अक्षरे, संदीप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय