काय ती करते खुणा
काय ती करते खुणा,
अन् काय माझ्या कल्पना...
काय बोले सत्य
अणि काय् माझ्या वल्गना....
एकदा ती हासली नी
जन्म झाला सार्थ हा..
.क्षणभरावर नोंद केवळ,
युग भरावर वंचना...
क्रूर हे रस्ते तुझे पण
मीही इतका निश्चयी....
टोचत्या काट्यास आता
पाय देती सान्त्वना...
त्या तुझ्या वाटेवरी
मज ठेच जेव्हा लागली..
गात उठले घाव ते अन्
नाचल्या त्या वेदना..
एवढेही तू नको घेउ
मनावर शब्द हे...
जा तुला म्हटलो खरा मी,
पण् जराशी थांब ना...
गाव माझे सोडताना
एवढे तू ऐक ना....
नाव माझे टाकताना
तू उसासा टाक ना.....
- नेणिवेची अक्षरे, संदीप खरे
0 अभिप्राय