मराठी कविता संग्रह

कसे सरतील सये

02:45 Sujit Balwadkar 5 Comments Category : ,

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्‌यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

आता नाही बोलायाचे ... जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ... विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झूले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरु झुरू दे ना
तेव्हा नाभा धरा सारी भिजवीला ना !!

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

"कसे सरतील सये" ह्या गाण्याची
गाण्यातलंच एक additional कडवं

.....कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोनं रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना ... भरतील ना

"तारा तारा छेडलेल्या आणि बागा फुललेल्या
सुरावटी तुझ्या स्मरताना..
एक काटा रुतलेला आणि तारा तुटलेला
आठ्वांची माळ माळताना

धुक्यातून शोधताना,दवबिंदू मोजताना
वेडं माझं मोरपिस जपशील ना..."

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

RELATED POSTS

5 अभिप्राय