आयुष्यावर बोलू काही
जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही;
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ,
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही !
तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या ,
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही !
हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे ,
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही !
उद्याउद्याची किती काळजी बघ रांगेतुन ;
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही !
शब्द असु दे हातामध्ये काठी म्हणुनी ;
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही !
जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही;
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
- मौनाची भाषांतरे, संदीप खरे
8 अभिप्राय
hi
ReplyDeletesheetal
nice..
ReplyDeletemy dear SANDIP......
really a beautiful & heartwarming kavita
ReplyDeleteEKDUM HATKE HRUDYASPARSHI
ReplyDeleteNice
ReplyDeletereally my frds i feel cummunication is important part our life
ReplyDeletehi sir, is any book of ayushyavar bolu kahi available in market if so plz reply me
ReplyDeleteमाझ्या मते संदिप खरे यांचे २ कवितसंग्रह आहेत ज्यात या आल्बम मध्यल्या काही कविता आहे. ते म्हणजे "मौनाची भाषांतरे" आणि "नेवीवेची अक्षरे".
ReplyDelete