पाणावले तरीही . . . .
पाणावले तरीही डोळ्यांस स्वप्न दिसते
अंधारले तरीही मजला प्रसन्न दिसते...
आहे मला गवसली, ही वेगळीच दृष्टी
ही कालचीच दुनिया मज आज भिन्न दिसते...
जेव्हा हसून बघतो, जग हासतेच सारे
जेव्हा उदास असतो, जग खिन्न-खिन्न दिसते...
मी दृष्य-कल्पनेतच इतका रमून जातो;
उधळीत रंग माझे मन स्वप्नमग्न दिसते...
"येतोच", तो म्हणाला, मी थांबलोच नाही
मी एकटाच आता अन वाट सुन्न दिसते...
मी वादळांस आता हृदयात बंद केले
कोणी 'अजब' म्हणू दे "घरदार भग्न दिसते"...
- अनामिक
0 अभिप्राय