23:18 सुजित बालवडकर 0 Comments Category : श्रीधर फडके , श्रीधर फ़डके , सौमित्र
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना
माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना
माझिया मना, जरा ऐक ना
सांजवेळ ही, तुझे चालणे
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पना
गीतकार :सौमित्र
गायक :आशा भोसले
संगीतकार :श्रीधर फडके
0 अभिप्राय