मराठी कविता संग्रह

ती गेली तेव्हा रिमझिम

01:37 सुजित बालवडकर 0 Comments Category :

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

गीतकार: ग्रेस
गायक:पं. हृदयनाथमंगेशकर
संगीतकार:पं. हृदयनाथमंगेशकर
चित्रपट:निवडुंग

RELATED POSTS

0 अभिप्राय