कीतीक हळवे कीतीक सुंदर
कीतीक हळवे कीतीक सुंदर
कीती शहाणे आपले अंतर
त्याच जागी येऊन जाशी
माझ्यासाठी माझ्या नंतर
अवचीत कधी सामोरे यावे
आन् श्वासा नी थांबून जावे
परस्परांना त्रास तरीही
परस्परा वीन ना गत्यंतर
भेट जरी ना या जन्मातून
ओळख ज़हाली इतकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही
त्याचेही तुज सुचते उत्तर
मला सापडे तुजे तुझेपण
तुला सापडे माझे मी पण
तुला तोलुनी धरतो मी अन्
तुही मजला सावर सावर
संग्रह : नामंजूर
कविता : संदीप खरे
संगीत : सलिल कुलकर्णी
0 अभिप्राय