00:22 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
काळा अंधार आणि पाऊस
मुकयानेच पडत होता
पाना फुलांवर सांडून
मनातच रडत होता
डहाळीला आता फुलांची
गरज उरली नव्हती
अन् आभाळ म्हणत होत
चंद्रा विना रात्र ही सरली होती
आता त्याच्यासाठी सूर्य
आला होता म्हणून
त्या अस्ताच्या जागेवर
त्याने मला एकटीला सोडली होती
0 अभिप्राय