मराठी कविता संग्रह

डिपारी डिपांग इचीपारी डिपांग इडीपारी डिचीपारी डिपा

01:27 Sujit Balwadkar 0 Comments Category :

डिपारी डिपांग इचीपारी डिपांग इडीपारी डिचीपारी डिपांग
काळी माती, निळं पानी, हिरवं शिवार
ताज्या ताज्या माळव्याचा भूईला या भार
ज्वानीच्या या मळ्यांमंदी पिरतीचं पानी
बघायला कवतिक आलं नाई कुनी
मळ्याला या मळेवाली भेट्टलीच न्हाय
अगं रानी माझ्या मळ्यांदी घुसशील काय
डिपारी डिपांग इचीपारी डिपांग इडीपारी डिचीपारी डिपांग ॥ धृ ॥
ए पोरी,
काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा
मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा
(तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा)
लिंबावानी कांती तुझी, बीटावानी ओठ
टंबाट्याचे गाल तुझे, भेंडीवानी बोटं
काळजात मंडई तू मांडशील काय
अगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय
डिपारी डिपांग इचीपारी डिपांग इडीपारी डिचीपारी डिपांग ॥ १ ॥
नको दाऊ, भाजीवाल्या, फुकाचा रूबाब
भाजी तुझी वर ताजी, आतून खराब
(नको दाऊ फुकाचा रूबाब,तुझी भाजी आतून खराब)
गोड गोड बोलशील, पाडशील फशी
भाजी तुझी, पाटीमंदी घेऊ तरी कश्शी ?
आज-काल कुनाचा बी भरवसा न्हाय
ए ए ए ए
रानी माझ्या मळ्यांमदी घुसशील काय
डिपारी डिपांग इचीपारी डिपांग इडीपारी डिचीपारी डिपांग ॥ २ ॥
तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत
खुरपला जीव-दिल काळजाचं खत
राखायाला मळा केली डोळ्याचीया वात
बुजगावण्याच्या परी उभा दिन-रात
नको जळू दिन-रात, नको जीव टांगू
ठाव हाये मला सारं, नको काही सांगू
पिरतीत राजा तुझ्या, न्हाई काई खोड
तुझ्या हाती मिरची बी लागतीया गोड
माझ्यासंग मळा तुझा कसशील काय ?
अगं आई गं
रानी माझ्या मळ्यांमदी घुसशील काय
डिपारी डिपांग इचीपारी डिपांग इडीपारी डिचीपारी डिपांग ॥ ३ ॥
- संदिप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय