मराठी कविता संग्रह

आणि पापण्या भिजल्या आहे

01:46 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

ओघळलेले शुभ्र कवडसे,
चंद्र चांदण्या रुसल्या आहे,
सळसळणारी पाने तरिही,
अशा सावल्या थिजल्या आहे…

असे दावणी बैल जोडही,
चारा भिजुनी पिचला आहे,
गोठुन गेल्या पानांवरती,
ओघळथेंबी टिकल्या आहे…

गिरक्या घेउन वारा वाहे,
कुडकुडणारा प्रवास आहे,
ऊब घ्यावया जाइ हात ज्या,
तैल दीपिका विझल्या आहे…

धुके दाटल्या वेशीवरुनी,
भास असा हा अवचित आहे,
एकतारिची तुण तुण वाटे,
जसे चाहुली शिकल्या आहे…
कोरड पडल्या माळावरती,
निसर्ग राजा हसला आहे,
हसण्याची मग सीमा तुटली,
आणि पापण्या भिजल्या आहे

– मन ANAMIK

RELATED POSTS

0 अभिप्राय