मराठी कविता संग्रह

चला जाऊ द्या पुढे काफिला

02:19 सुजित बालवडकर 0 Comments Category :

चला जाऊ द्या पुढे काफिला
अजुनि नाही मार्ग संपला
इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू
जाता जाता एक विसावा, एक रात्र थांबू
इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू.
थोडी हिरवळ, थोडे पाणी
मस्त त्यात ही रात चांदणी
उतरा ओझी विसरा थकवा
सुखास पळभर चुंबू,
इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू
अंगी शहारे जशी खंजिरी
चांदही हलला, हलल्या खजुरी
हलल्या तारा, हलला वारा
नृत्य लागले रंगू,
इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू
निवल्या वाळूवरी सावली
मदमस्तानी नाचु लागली
लयीत डुलती थकली शरिरे
नयन लागले झिंगू,
इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू


– ग. दि. माडगुळकर
चित्रपट: गुळाचा गणपती
संगीत: पु. ल. देशपांडे
गायक: आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे

RELATED POSTS

0 अभिप्राय