मराठी कविता संग्रह

माझे मृत्यूपत्र....

02:00 Sujit Balwadkar 0 Comments Category :

मी मेल्यावर, माझ्यासाठी कुणी रडू नये...
फुलांच्या भाराखाली, प्रेत माझे मढू नये...

रचावी मजसाठी, साध्या कष्ठांचीच चिता;
चंदनाचा सहवास, मला कधी घडू नये...

घडावी मोकळ्या कुरणात, मला मोक्षप्राप्ती;
मजसाठी स्मशानाची पायवाट, कुणाच्या पायाखाली पडू नये...

उडावी खुल्या हवेत, माझ्या राखेची वावटळं;
माझ्या अस्थी कुठल्याही, नदीतळाशी सडू नये...

मी गेल्यावरही रहावे, सगळ्यांनी आनंदात;
माझ्या नसण्याने कधीही, कुणाचे काही अडू नये...

मी मेल्यावर, माझ्यासाठी कुणी रडू नये


- निरज कुलकर्णी

RELATED POSTS

0 अभिप्राय