मराठी कविता संग्रह

आता काय सांगणार

02:43 Sujit Balwadkar 0 Comments Category :

आता काय सांगणार
तुला कसे सांगणार
की बोलायचे आहे ,ते मनातच राहणार
स्वप्नात राहू
कसे मी सहु
की तुला दररोज ,फक्त चोरुनच पाहु
केव्हा तू फसणार
गालात खुदु हसणार
भांडून माझ्याशी,लगेच रुसणार
लाडे कुशीत बसणार
हृदयात चूप घुसणार
वाट पाहशील माझी ,जेव्हा मी नसणार
केव्हा तू येणार
मला होकार देणार
केव्हा वरात ,तुझ्या घरी नेणार

- विजय कुद्ळ

RELATED POSTS

0 अभिप्राय