मराठी कविता संग्रह

रक्तात वाहती राजे

11:06 सुजित बालवडकर 0 Comments Category :

सुधीर मुळीक
सुधीर मुळीक
सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे,
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !!
सन्मान राखतो, जान झोकतो,
तुफानं मातीचा राजा !!
झुकवून तुतारी माना, शंख नाद हा वाजे,
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
उत्तुंग हिमालय, शान हिंदवी,
जगदंबेचा टिळा !!
सुराज्य थाटले, मेढ रोवली,
स्वातंत्र्याची शीळा !!
ही तलवार भवानी पाहून, तोफ फिरंगी लाजे,
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
ते रक्तं सांडले, प्राण वेचले,
नसे उगाच बाता !!
जगणे त्यांचे, जगणे होते,
त्या वेगळ्याच वाटा !!
ही आहुती त्या वीरांची, काय तुझे नि माझे,
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!

- सुधीर मुळीक

RELATED POSTS

0 अभिप्राय