01:54 सुजित बालवडकर 0 Comments Category : अभिजीत दाते
नकोच माझा विषय आणखी
जरा टळू दे प्रलय आणखी
विसर तुझा पडला असता पण
जिवास नव्हती सवय आणखी
महाल नाही घरटे आहे
कुणास देउ ह्रदय आणखी
हवीहवीशी हार मिळेना
नकोनकोसे विजय आणखी
तुझ्यासवे नाव जोडलेले
हवे कोणते वलय आणखी
सजाच होती एक प्रकारे
दिलेस जेव्हा अभय आणखी
- अभिजीत दाते
0 अभिप्राय