मराठी कविता संग्रह

अजूनी वाट एकाकी गं

17:43 Sujit Balwadkar 0 Comments Category :

अवसेची ही रात उजळते, अंधाराच्या वाती गं
शोधित फिरते सुर्य उद्याच्या, अजूनी वाट एकाकी गं ॥ धॄ॥

सुर्य लोपता, अवतीभवती विश्व काजळी उरते गं ।
कशी शांतता यास म्हणू, हे वेध वादळी भलते गं।
लाटांवर भिरभिरते नौका, अणि किनारा नाही गं ॥१॥

शोधूनी दमले इथे सीयावर, सभोवताली लंका गं
फोडित टाहो ‘कृष्ण’ नावचा, द्रोपदी भोवती जमल्या गं
असे शहर अन असे प्रहर अन कुठे दिलासा नाही गं ॥२॥

विजनवास अन रात तमाची, वाट जरी काचेरी गं
आज पायी रुतल्या काचांची, उद्या झुंबरे होतील गं
आम्हीच होवू दीप आमुचे, अभिमानाच्या वाती गं ॥३॥

चालायाचे तोवर मजला, अजूनी वाट एकाकी गं ॥

.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}- सुधिंद्र दि. देशपांडे
ई-पत्ता: sudhindra.deshpande@hotmail.com

RELATED POSTS

0 अभिप्राय