मराठी कविता संग्रह

क्षणात

19:15 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

सुजित,
तुझा म.क.सं. संकेतस्थळ पाहिलं... रोज वाचतही असतो...
मराठी कवितेंसाठीचं हे तुझ काम खुपच आश्वासक अणि नव्या कवींना उर्मी देणारं आहे..
खुप खुप धन्यवाद अणि अभिनंदन...
हे संकेतस्थळ एवढं देखणं आहे की माझ्या काही कविता इथे असाव्यात असा मोह होतो आहे.
त्यासाठीसुध्दा हा पत्रप्रपंच...!! एक कविता सोबत देत आहे. आवडल्यास नक्की कळविणे.



क्षणात होते जांभ गुलाली
क्षणात सांज का लाल दिसे
क्षणात दाटे अबीर भोवती
क्षणात चांदणपूर असे

क्षणात वाजे मनात वेणू
क्षणात उदासी शांत तडे
क्षणात रुमानी पाऊसवेळा
क्षणात भगवा ऊर रडे

क्षणात पश्चिम हळवी होते
निघता निघता पाय अडे
क्षणात भरल्या उरात घेतो
मावळतीचे सोनसडे

क्षणात दिसते गाव ‘उद्याचे’
क्षणात ‘कालचे’ दूर थवे
क्षणात नाही शक्य सांगणे
काय नको अन काय हवे...!

.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}



भवदीय:

सुधिंद्र दि. देशपांडे
ई-पत्ता: sudhindra.deshpande@hotmail.com

RELATED POSTS

0 अभिप्राय