वसंत ही निष्पर्ण आता
शिशिराचे ते भोगच आता आले माझ्या नशिबातही
कशी करावी रुजवण कळेना तुझ्यावाचूनी जगण्याची
कातरवेळी दाटून येते आठव आपुल्या स्वप्नांची !
घायाळ मनाला कसे कळावे नियम वास्तव जगण्याचे
गाडलेल्या स्मृतीच देती सुख रोजच्या मरण्याचे
आश्विन जाता कार्तिक येई दिव्या-दिव्यांची आरास जगी
काजव्यांचा प्रकाश ही छळतो अंधारच आता सोबती !
देऊन गेलीस चटके इतके भिती न आता त्या सरणाची
आस मनी ती एकच आता पुनर्जन्माच्या मिलनाची
आठवशील का मनी कधी तरी सांज-वेळ ती भेटीची
रचून गेलीस चिता मनाची आग ही दे त्या दहनाची !
- अंजली राणे वाडे : ०६/०८/१३. वसई .
1 अभिप्राय
You are doing outstanding work.Keep it on.
ReplyDelete