मराठी कविता संग्रह

आसवांनी आज माझ्या

00:52 सुजित बालवडकर 0 Comments Category :


Share on Facebook



आसवांनी आज माझ्या का असे हे बंड केले
भावनांचे कल्लोळ सारे पापण्यांनी कैद केले !
पाळले मीच होते पदरात माझ्या साप सारे
पोसले रक्तावरी जे डंख त्यांचे जहर झाले !

पाहिली स्वप्ने जी सारी गर्भ-वेदना साहताना
पूर्णत्वांच्या त्या रूपाने का अशी मी दग्ध झाले !
कवेत येता आभाळ सारे वात्सल्य मात्र भार झाले
रेशमी पदरास ही मग कर्ज ममते चेच झाले !

वास्तवाच्या दाहकतेने का असे मी व्यथित व्हावे
उडूनी जाता पाखरे आकाश माझे ही मुक्त व्हावे !
कोमेजणाऱ्या सर्वं कळ्यांचा आज मी आधार व्हावे
वटवृक्ष सिंधुताई झाल्या मी तयांचे रोपं व्हावे !

- अंजली राणे वाडे : २७/०८/१३. वसई .

RELATED POSTS

0 अभिप्राय