मराठी कविता संग्रह

देव चुकला वाटतो

17:04 सुजित बालवडकर 1 Comments Category :


जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो गणगोत इथला परकाच वाटतो.
लाचार हे आयुष्य बेकार मज वाटतो कण्हत रोज जगणे आता नकोवाटतो .
मी चाललोय प्रवासी तो रस्ताच चुकीचा होता मुक्काम जे लाभले तो गाव अनोळखी वाटतो .
आधार मी शोधला ते घर बंदिस्त होते अंधारात मी एकला छप्पर अपुरा वाटतो .
अस्वस्थ या वाटा अन मी मुसाफीर नवखा भेटला जो सोबती तो हि घातकी वाटतो .
आयुष्य माझे मला शत्रु समान झाले आयुष्य वाटताना देव चुकला वाटतो

- अमित अंजर्लेकर

RELATED POSTS

1 अभिप्राय