फक्त भुमीचे नाव नका काढु
भिंत धर्माची जाड घट्ट झाली
आणि रक्ताची सवय होत गेली
दिवा थरथरती दुष्ट फुंकरीने
आणि काळोखी रात्र विकट हासे
धनन् धन् धन् धन् जपति मंत्र सारे
ग्रंथवचने कोरडी शुष्क उडती
दिवा झगमगतो पालखी सभोती
आणि वहाणारा रुतत आत जाय
दैव उत्तर हे शोधुनि झकास
देव बघना श्रीमंत किती झाला
तळे ओसंडुन वाहतेय कोठे
गाळ गुदमरतो दबुन खोल आत
कावळ्यांची काळ्जी कशासाठी
फेकलेले हे फुकट सर्व त्यांचे
सुर्य तुमचा अन् चंद्रही तुम्हाला
फक्त भुमीचे नाव नका काढु
- वाटेवरच्या कविता, अशोक नायगांवकर
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
1 अभिप्राय
mitra khupcha schan
ReplyDelete