भाज्या
गळ्याशी नख खुपसून, अंदाज घेत क्रूर पणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची,
सपासप सुरी चालवत कांद्याची कापा काप चालली आहे, डोळ्याची आग आग होतीये,
शहाळ्या-नारळावर कोयत्या ने दरोडा घातला आहे,
हे भाजलं जात आहे वांग, निथळतंय त्वचेतून पाणी, टप टप,
तड ताडल्या मोहोरी, हा खेळ चाललाय फड फडात,
कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात,
आणि तिखट टाकल जात आहे, भाजीच्या अंगावर डोळ्यात,
धारेवर किसली जात आहे गाजरं,
पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्व हारा बनलीये कोय,
वरवंट्याखाली चिरडली जाते आहे मीठ मिरची,
बत्ता घातला जातो आहे वेलदोड्याच्या डोक्यात,
फडक्याने गळा ओढून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवल आहे चक्का बनवण्यासाठी,
हे भरडले जाताहेत गहू, लाही लाही होतीये मक्याची ज्वारीची,
भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडा च्या पोटात,
पोलीस नुसतेच बघतायत,
संत्र्या मोसंबी केळ्यांची वस्त्र उतरवली जातायत,
हे काय चाललायं, हे काय चाललायं....
.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}
2 अभिप्राय
टंकलेखनाकडे थोडा लक्ष द्यावा.
ReplyDeleteपोस्ट करण्याआधी एकदा वाचून पाहिल्यास बरे होईल.
सुचना मान्य आहे. पुढील कवितेपासून कविता टाकण्याआधी काळजी घॆईन. माझी अनुदिनी अशीच वाचत रहा. धन्यवाद.
ReplyDelete