संवाद बीज होते
अंधारल्या जगाच्या साक्षीस तेज होते
आकाश सावराया लघु एक बीज होते
भोळ्यास जीव लावी धूर्तास दे निशाणी
सामावते जगाला संपूर्ण बीज होते
शांतीत लाव ज्वाळा, ज्वाळेत अमृतेही
भासांसवे निराळे उन्माद बीज होते
रोधात आणि माया, मायेत आणि ताठा
निर्माल्यसे उरावे निष्पाप बीज होते
काया मनास जोडी, तोडी मनास गर्वे.
संपूनही दिसावे नितांत बीज होते
होते कुणास ठावे आशीश पामराला
सर्वात व्यापलेले संवाद बीज होते
- संहिता हिस्वनकर
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
1 अभिप्राय
आपली कविता खूप आवडली
ReplyDelete