मराठी कविता संग्रह

काही ओव्या

18:56 सुजित बालवडकर 1 Comments Category :

तुझ्यापाठी गेलो फरफट झाली
किमंत कळाली आपसूक

फिटून विटली हौस बोलण्याची
तुला ऐकण्याची जाइचना

घटका विसावा घेतलास निघ
कर लगबग वेळ कोठे

खदखदतोय काळ माझ्यावर
कर्तव्याचा भार थर कापे

अद्दल घडावी असे झाले काही
पोर उभे राही दारातच

फिरून तुझ्याशी येत राहीन बा
चटावलो मी वा म्हण काही

फार फार तर उशीर होइल
कर्तव्य निभेल नंतरही

लावून घेशील एव्हढे-तेव्हढे
मलाही हळवे करशील

- समीर चव्हाण

RELATED POSTS

1 अभिप्राय