कलमाडींची लावणी..
कॉमनवेल्थच्या नावाने,
पुण्याच्या या रावाने,
कोट्यवधी पैसा आहे ओढीला,
आता नका सोडू कलमाडीला..
माहितीचा कायदा लाखमोलाचा,
लागे छडा नव्या नव्या घोळाचा, घोळाचा बाई घोळाचा
तिहारात धाडू राजा, चव्हाणही जोडीला
आता नका सोडू कलमाडीला..
आता नका सोडू कलमाडीला..
जागी झाली जनता आलं लक्षात जी लक्षात
राहिला ना वाली कुणी पक्षात जी पक्षात
भोकं लागली पडाया ‘युपीए’ च्या होडीला..
आता नका सोडू कलमाडीला..
आता नका सोडू कलमाडीला..
लाज थोडी ठेवा जनामनाची,
तोड काही काढा काळ्या धनाची, धनाची बाई धनाची
लगाम घाला की जरा करप्शनच्या घोडीला..
आता नका सोडू कलमाडीला..
आता नका सोडू कलमाडीला..
– अभिजीत दाते
मूळ गीत — रेशमाच्या रेघांनी
कवयित्री – शांता शेळके
प्रेरणा – कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमाडींना झालेली अटक
0 अभिप्राय