पाउस..!
मराठी कविता कम्युनिटीतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या एका स्पर्धेत या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला त्याबद्दल अभिजीत दाते यांचे अभिनंदन
ता. क. - या स्पर्धेचे परीक्षक संदीप खरे हे होते
खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..!
छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..!
मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला.
तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..!
कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला.
मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..!
अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली.
रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..!
कधी सरीतून निघता जखमांवरची खपली.
स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..!
तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!
– अभिजीत दाते
<p class="reddish box">- गदिमा</p>
3 अभिप्राय
Hi Sujit,
ReplyDeleteHow r u. Your website is fantastic. You r doing a very good job.
for above poem : Congrats tp Mr.Abhijeet Datey.
Very nice poem.
If you agree, can you post my poem to your website?
bye. TC
Hrishikesh
khoopch chhan..abhinandan...!!!
ReplyDeletegood one
ReplyDelete