मराठी कविता संग्रह

पिलोक ( प्लेग )

02:11 Sujit Balwadkar 0 Comments Category :

पिलोक पिलोक
आल्या पिलोकाच्या गाठी
उजाडलं गांव
खयामयांमधीं भेटी
पिलोक पिलोक
जीव आला मेटाकुटी
भाईर झोंपड्या
गांवामधीं मसन्‌वटी
पिलोक पिलोक
कशाच्या रे भेठीगांठी !
घरोघरीं दूख
काखाजांगामधीं गांठी
पिलोक पिलोक
आतां नशीबांत ताटी
उचलला रोगी
आन् गांठली करंटीकवयित्री - बहिणाबाई चौधरी

RELATED POSTS

0 अभिप्राय