मराठी कविता संग्रह

तो प्रवास कसला होता..........

03:33 सुजित बालवडकर 6 Comments Category :

तो प्रवास कसला होता, मी स्वत:स पुसुनी थकलो
तू प्रारंभच ना केला; अन मी अर्ध्यातुन वळलो !

तुजवरी लावला जिव... हे मुळात चुकले माझे
मी पाउस हुडकायाला ग्रिष्माच्या गावा शिरलो !

कधी जनातुनी... कधी विजनी.. कधी नयनी.. मनात अंति !
कधी तुला शोधण्यासाठी बघ कुठवर वनवन फिरलो...

दिनरात धाडली तुजला मी निमंत्रणे कवितांची
पण खरेच आलीस तेव्हा शब्दांच्या मागे दडलो

मेंदिभरल्या हाताने सनईचे वेचीत सुर
तू सुखात रडलीस तेव्हा मी उदास होउन हसलो...

RELATED POSTS

6 अभिप्राय

  1. thas true meaning of love

    ReplyDelete
  2. nagesh jatkar23/09/2011, 04:08

    realy beautiful touches heart

    ReplyDelete
  3. Dilip Deshmukh.01/06/2012, 19:03

    अप्रतिम ! मनाला पर्श करणारी कविता .

    ReplyDelete
  4. Dilip Deshmukh24/08/2012, 19:34

    अप्रतिम कविता ! मनाला पर्श करून गेली .

    ReplyDelete
  5. siddhi upadhye11/02/2013, 21:46

    chan kavita!

    ReplyDelete
  6. Anjali Rane Wade15/02/2013, 13:32

    khup chhan

    ReplyDelete