मराठी कविता संग्रह

अल्कोहोल

00:53 सुजित बालवडकर 0 Comments Category :

बेगम बाजार तो हो आया मै
लेकिन अनाज नहीं
हा कुछ शीशे का सामान जरुर लाया हु .
(खुदा ने कहा है बंदे तेरे खाने का जिम्मा मेरे सर पर
लेकिन पिने के बारे मै उसने कुछ नही कहा
सो पिने की जिम्मेदारी मैंने ही लेली...)

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल
भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल
दुनियेसाठी टाकाऊ अन नको-नकोसे गटार हे
माझ्यासाठी निर्झर होऊन खळखळणारे अल्कोहोल

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल...
भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल

साथ कुणी इतकी ना देते
हाक कुणाची ना मिळते
रक्तासोबत इमान होउनी विरघळणारे अल्कोहोल

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल...
जगासवाटे अनैतिक जे निषेध करते जग ज्याचा
आशा होउनी दुखःवरती हळहळणारे अल्कोहोल

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल...
(सन्मानाचे दिवस झेलतो जरी कौतुके जग अवघे
तिच्या कटाक्षावाचून रात्री तळमळणारे अल्कोहोल ...)

फणा काढल्या मृत्युवरती मोहून गेला मंडूक मी
मंडूक म्हणजे?...बेडूक रे बेडूक दादा...
जातीवंतसे जहर होउनी सळसळणारे अल्कोहोल ...

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल...
(रसायनांची किमया नामी , यमदुतांचे कष्ट कमी
हे मृत्युचे भाग्य होउनी फळफळणारे अल्कोहोल)
मी तय पितो ,ते मज पिते
दोघांमध्ये खेच सुरु
पुरून उरुनी खळग्यापाशी भळभळणारे अल्कोहोल...

- संदिप खरे, सांग सख्या रे ..

RELATED POSTS

0 अभिप्राय