मराठी कविता संग्रह

समजावणी

16:46 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

( वसईच्या वाडवळी बोलीतील ही कविता. मुसळधार पडणाऱ्या पावसाची, एका गृहिणीने घातलेली ही समजावणी.)

अवडा पर जाला का तुला
कांय होते रे आबा
कोण पोटात रेते तुया उबा
आथं तरी बस कर रे बाबा धृ .. ..

पोटाईन अलेल्या बायकोयावाणी
खाली उतरतात जये ढग
वाटते आथ्थंस बुडेल यं जग
जीवायी कायली होते मंग
बस कर रे बाबा आथं तरी बस कर ... .. 1 ..

तू केला रागावलाय अवडा
तरी माथ्यात भरते ईजेया केवडा
कोण थोपील रे या गडगडाटा
बस कर रे बाबा आथं तरी बस कर ... .. 2 ..

वावून गेला तुआ जकला पाणी
मयना जाल्या रगताया वाणी
माफ कर रे बाबा आमशी करणी
बस कर रे बाबा आथं तरी बस कर ... .. 3 ..

पडून पडून तू थकला रे
रडून रडून तू भगला रे
तू माआ जकल्यात धकला रे
बस कर रे बाबा आथं तरी बस कर ... .. 4 ..

[slider title="शब्दार्थ"]

शब्दार्थ --
अवडा पर - या प्रहरी, या वेळी
जाला - झाला
आबा - आभाळ
उबा - उभा
आथं - आता
पोटाईन - गर्भवती
आथ्थस - आत्ताच
अवडा - इतका
वावून - वाहून
जकला - सगळा
मयना - महिना, ऋतुस्त्राव
आमशी - आमची
धकला - धाकटा मुलगा
भगला - भागला, थकला[/slider]

RELATED POSTS

0 अभिप्राय