मराठी कविता संग्रह

मेघ नसता वीज नसता

02:07 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले,
जाहले इतुकेच होते की, तुला मी पाहिले..

गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा,
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले..

एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला,
रंगदेखील पाकळ्यांवर भार वाटू लागले..

लाख नक्शत्रे उराशी नभ तरीही हळहळे,
हॆ तुझे नक्शत्र वैभव का धरेवर राहीले..

पाहता तुज रंग उडूनी होई गजरा पांढरा,
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले..

भर पहाटे मी फुलांनी दृश्ट काढून टाकली,
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले..

मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले,
जाहले इतुकेच होते की, तुला मी पाहिले

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय