मराठी कविता संग्रह

हारण्यास एक नवा, डाव पाहिजे

18:58 सुजित बालवडकर 2 Comments Category :

रुबाई:-

सोडले कालच्या किनाऱ्याला
वादळे घेतली निवाऱ्याला
घेतले मी नवे पुन्हा फासे
हारण्याची नशा जुगाऱ्याला

गज़ल :-

हारण्यास एक नवा, डाव पाहिजे
साकळे जुना,नवीन घाव पाहिजे......

फत्तरास ही फुटू शकेल पालवी
आसवात तेव्हढा प्रभाव पाहिजे........

अंध:कार संपणार आज ना उद्या
फक्त एक ज्योतीचा उठाव पाहिजे.....

दु:ख हेच एकमेव सत्य जीवनी
त्यातही हसायचा सराव पाहिजे......

- संगीता जोशी

RELATED POSTS

2 अभिप्राय

  1. खुपच सुदंर गजल् संगिता जोशी यांची , भिमराव पांचाळे यांचे सुरेख गायन.
    अप्रतीम संग्रह.
    great collection keep it up.

    ReplyDelete
  2. shrikant v patil01/06/2012, 04:29

    Apratim sundar Gazal aani gayan...

    ReplyDelete