मराठी कविता संग्रह

कंठातच रुतल्या ताना, कुठे ग बाई कान्हा

16:53 सुजित बालवडकर 0 Comments Category :




कंठातच रुतल्या ताना, कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा, जा, जा, जा, घेउनि या मोहना ॥धृ.॥

कदंब-फांद्यावरी बांधिला, पुष्पपल्लव-गंधित झोला
कसा झुलावा, परि हा निष्चल, कुंजविहारीविना ॥१॥

थांबे सळसळ जशि वृक्षांची, कुजबुज सरली झणि पक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता, थबके ही यमुना ॥२॥

मुरलीधर तो नसता जवळी, सप्तस्वरांची मैफल कुठली ?
रासक्रिडेची स्वप्ने विरली, एका कृष्णाविना ॥३॥

<ul> <li>[slider title="More Info" group="More Info"] <p>गीत : गंगाधर महांबरे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : आशा भोसले

ज्येष्ठ कवी गंगाधर महांबरे यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २२ - "संधिकाली या अशा', "कंठातच रुतल्या ताना', "रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते' आणि "पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव' या लोकप्रिय गीतांचे निर्माते आणि ज्येष्ठ कवी गंगाधर महांबरे (वय ७७) यांचे सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे महांबरे यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यां च्या मेंदूत रक्तस्राव होऊन त्याच्या गाठी झाल्या होत्या. शस्त्रक्रिया करून या गाठी काढण्यात यश आले असले तरी शेवटपर्यंत ते शुद्धीवर आले नाहीत. रात्री नऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. महांबरे यांचा मुलगा सध्या अमेरिका येथे असून तो भारतात परतल्यावरच महांबरे यांच्या पार्थिवावर अं त्यसंस्कार करण्यात येणार आहेतौ

महांबरे यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी मालवण येथे झाला. गोव्यातील म्हापसा हे त्यांचे मूळ गाव. चरितार्थासाठी ते मुंबईला गेले. "संतांची कृपा' या नाटाकातील पदे त्यांनी लिहिली. त्याची पदे खरे तर यशवंत देव हे लिहिणार होते. पण, ते आजारी पडल्याने त्यांनीच महांबरे यांचे नाव सुचविले. मालवण येथे १९५३ मध्ये कवी अनिल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात महांबरे या ंनी कविता सादर केली होती. त्याबद्दल आचार्य अत्रे यांनी त्यांची प्रशंसा केली होती. पुण्याच्या "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते.

"पैसे झाडाला लागतात', "सर्वस्वी तुझाच', "गा भैरवी गा', "चाफा बोलेना', "तेथे कर माझे जुळती' या नाटकांच्या पदलेखनाबरोबरच महांबरे यांनी "धाकटी मेहुणी', "सोबती', "युगे युगे मी वाट पाहिली' आ णि "सौभाग्यकांक्षिणी' या चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांच्या "मौलिक मराठी चित्रगीते' या पुस्तकाला २००३ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते. भक्तिगीते, भावगीते लिहिणाऱ्या महांबरे यांनी करिअर आणि उद्योगाच्या वाटा या विषयावर तितक्‍याच ताकदीने विपुल लेखन केले. त्या ंची ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
...................

महांबरे यांची लोकप्रिय गीते -
निळा सावळा नाथ
पाण्यातले पहाता प्रतिबिंब भासणारे
तू विसरुनी जा रे विसरूनी जा
धुंद धुंद ही हवा मंद मंद गारवा
रामायणात माझ्या सीता कशास आली
चुकवून आज आले सारा खडा पहारा
शुभंकरोती म्हणा मुलांनो.[/slider]</li> </ul>

RELATED POSTS

0 अभिप्राय