चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली !
चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली !
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली !
मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन् चोरपावलांनी आला पहाटवारा
गालांवरी उषेच्या आली हळूच लाली !
घे आवरून आता स्वप्नांतला पसारा
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा
तव गीत गात सारी ही पाखरे उडाली !
तुज दूर हाक मारी कालिंदिचा किनारा
कुंजांतल्या फुलांनी केला तुला इशारा
तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली !
गीत - सुरेश भट
संगीत - दशरथ पुजारी
स्वर - सुमन कल्याणपूर
राग - पहाडी (नादवेध)
0 अभिप्राय