सोन्याच्या मोहरा
गेले उकरुन घर
नाहि भिंतीना ओलावा.
भर ओंजळी चांदणे,
करु पाचुचा गिलावा.
भर ओंजळी चांदणे,
करु पाचुचा गिलावा.
आण लिम्बोणि सावल्या,
नाही आढ्याला छप्पर.
वलचणिच्या धारांना,
लाऊ चंद्राची झालर.
पायओढ त्या वाळुची,
आण तेव्हाची टोपली.
कधी खेळेल आंगणी,
तुझी माझिच सावली?
गेले उकरुन घर,
जाऊ धुक्यात माघारा.
कधी पुरुन ठेवल्या,
आणु सोन्याच्या मोहरा.
- ग्रेस
0 अभिप्राय