वाट....
तू येशील म्हणून मी वाट पहातो आहे,
ती ही अशा कातर वेळी,
उदाच्या नादलहरी सारख्या
संधी प्रकाशात...
माझी सर्व कंपने इवल्याशा ओंजळीत
जमा होतात....
अशा वेळी वाटेकडे पाहाणे ,
सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म
लकेरीत तरंगत जाणे;
जसे काळोखातही ऎकू यावे दूरच्या
झऱ्याचे वहाणे....
मी पहतो झाडांकडे , पहाडांकडे,
तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो.....
आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो
नदीच्या प्रवाहात...
- संध्याकाळच्या कविता, ग्रेस
1 अभिप्राय
kavi grase yana , majha manacha mujra . hy kavitetalya bhavana kahrach khup bhauk ahet
ReplyDelete\