मराठी कविता संग्रह

तुझ्या आठवणींचे सल...

23:25 Sujit Balwadkar 0 Comments Category :

तुझी वाट सुनी सुनी,
तशी ती खुपचं जूनी..
तरीही आज लाबं लांब वाटतेय,
चालतना ती, मग उगाच
आठवणीने तुझ्या पापण्यात दवं साठतय...

तुझी कहानी माझ्या मनोमनी,
वाचतो मी मोठ्या आवडीनी,
तरीही ती आज खुप मोठी वाटतेय
वाचताना ती, मग उगाच
शब्दा शब्दात आठवणीचा पान्हा फुटतोय..

तुझ गाणं माझ्या वचनी,
गुणगुणतो मी माझ्या सवडीनी,
तरीही ती आज मला गझल वाटतेय,
गुणगुणताना ती, मग उगाच
मैफिलीत माझ्या सुन्याचे तरंग उधळतेय..

तुझा चेहरा माझ्या नयनी,
पाहतो त्याला मी चोरूनी,
तरीही तो मला आज उदास आरसा भासतोय,
पाहताना त्याला, मग उगाच,
माझे प्रतिबिंब मी एकांतात रडताना पाहतोय...

-- आ..आदित्य

RELATED POSTS

0 अभिप्राय