मराठी कविता संग्रह

हास्य उधळून निघालो

17:55 Sujit Balwadkar 0 Comments Category :

हास्य उधळून निघालो
दु:ख कुरवाळून निघालो
ती लाजली जराशी
स्वप्नांत होरपळून निघालो

हात धरला तीने
स्पर्शात विरगळून निघालो
चेहरा लपवला हातात
चंद्र माळून निघालो

मिठीत घेतलं अलगद
कापसात पिंजून निघालो
भार ओठांचा दिला ओठांना
अमृत चगळून निघालो

बट सावरली केसांची
मेघात जळून निघालो
"काय करतोस" पुटपुटली
भावना आवळून निघालो

लाजून "ईश्य" म्हणाली
शब्दात पोळून निघालो
"येते मी आता"
मी अश्रूं गिळून निघालो

- सुरेश भट

RELATED POSTS

0 अभिप्राय