मराठी कविता संग्रह

आणि ध्येयं म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो

01:18 Sujit Balwadkar 0 Comments Category :

कधिकाळी जुळलेल्या स्वप्नातल्या गाठीभेठी
आज आठवणी होऊन सामोर्‍या आल्या
थोडेसे पाणी या कोरडया डोळयात
पण बराचसा आधार मनात देऊन गेल्या

आज त्यांना मी काहीच नं बोलता जाऊ दिले
मनातं नसतानाही ओघळणारे अश्रू पाहू दिले
आता मात्र चित्र माझ्या जीवनाचे आज पुन्हा एकदा सजवतो
आणि साज म्हणून या आठवणींनाच रंगं बनवीन म्हणतो

आठवतात ते दिवस अगदी कालच घड्ल्यासारखे
दोघचं घडवत होतो शिल्प स्वप्नांचे जणू जिवंत असल्यासारखे
स्वप्नांच्या छायेत आज पुन्हा एकदा विसावतो
आणि शीतल म्हणून या आठवणींनाच सावली बनवीन म्हणतो

देहभांन विसरायचे ते दिवस होते पावसाचे
हातात हात गुंफून फुलताना एकरुप होवून झुलायचे
ओल्याचिंब गारा आज पुन्हा एकदां वेचतो
आणि ओल्या म्हणून या आठवणींनाच सरी बनवीन म्हणतो

त्या दिवसांनी दिली कष्टाला स्फूर्ती, यशाला आनंदाची आसवे
चार गूंज मायेचे उन्हात चांदणे शिंपडल्यासवे
अनुभवण्या स्पर्शही आज पुन्हा एकदां धजतो
आणि ऊब म्हणून या आठवणींनाच कुस बनवीन म्हणतो

नसले उद्या सोबत्त कोणी तरी नसतील आठवणी सर्वस्व
वेदनेतले सुख शोधत असेल विवेकाचे वर्चस्व
आयुष्याचे आव्हान आज पुन्हा एकदां स्वीकारतो
आणि ध्येयं म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो...........
आणि ध्येयं म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो

- परमानंद

RELATED POSTS

0 अभिप्राय