मराठी कविता संग्रह

लळा लावते

11:27 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

अभिजीत दाते
अभिजीत दाते
गुदमरतो मी, कोणी इतका लळा लावते
अन कोणी गुदमरण्याला सापळा लावते

प्रेमाचाही सूर कुणाचा चुकतो येथे
कुणी विराणी गातानाही गळा लावते 


लिहिले होते काल तेच मी आज लिहीतो
परिस्थिती पण अर्थ वेगवेगळा लावते 

जितेपणी ही दुनिया करते कुठे चौकशी 
मेल्यावरती पिंडाला कावळा लावते

परके कोणी उन्हातही छाया देते अन
कुणी आपले सावलीसही झळा लावते

-- अभिजीत दाते (२२ डिसेंबर २०१४)

RELATED POSTS

0 अभिप्राय