मराठी कविता संग्रह

जागरणाच्या कविता ....( तो ...)

10:29 सुजित बालवडकर 0 Comments Category :

उनाड‬ 
ने अता रडणं सोडून दिलय
तो हल्ली विनाकारण हसतो!
हसता-हसता डोळे पाणावलेच
तर कुणालाही न कळता पुसतो...
तो पावसात बाहेर पडत नाही
तो ऊन्हावर सध्या चिडत नाही,
बाहेर अखंड पाऊस बरसला तरी
तो साधी खिडकीही उघडत नाही!
कविता सोडाच, पण त्याने तिचं
नाव गिरवणही दिल आहे सोडून,
हिंडत असतो असा जणू एखादा
फिरतो विरक्तीची वस्त्रे ओढून...
एकांती स्वतःशी तो खुप रमतो,
पण गर्दीत आला की कळवळतो...
त्याच्यासारखा कोणी दिसला,
तर तळमळतो अन् व्याकूळतो...
माझ्यातला तो असा का वागतो,
मला कधी काही कळले नाही!
पण हे ही खरे की त्याच्याईतके,
मला कधीच कुणी छळले नाही!!
 - उनाड‬ ... ( तुझं देण अजुन सांभाळतोय )

RELATED POSTS

0 अभिप्राय