मराठी कविता संग्रह

मैखाना

18:50 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,


व्हिस्की बरोबर करायचा असतो
स्वप्नील रोमान्स...क्षण दोन क्षणांचा
अन रमवर पडायचे असते तुटून प्रच्छन्न प्रेमिके सारखे....

व्होडकाचे करायचे असते स्वागत
बर्फाळ प्रदेशातून आलेल्या राजनैतिक पाहुण्यासारखे...

जिन असते
बायको आपली आपण सोडवू शकेल
अशा घरातल्या प्रश्नासारखी !

ब्रंडी असते अगदीच प्रासंगिक,
प्रत्येक ऋतूत एकदा भेटून जाणाऱ्या सर्दीखोकाल्या सारखी....

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

बिअर मात्र असते आडवयीन, आडवाटेच्या मैत्रिणीसारखी...
कधीही, कुठेही भेटू शकणारी....
तुमच्यासकट नाही नाही म्हणत तुमच्या बायकोलाही पटू शकणारी...
कमी भेटली तर चुटपूट लावणारी...
जास्त भेटली तर डोकं दुखावणारी...
आणि भेटलीच नाही तर हुरहूर लावणारी....

-मौनाची भाषांतरे, संदिप खरे

Image courtesy: संदिप खरे

संदिप खरे यांच्या इतर कविता -

  1. ब्लँक कॉल

  2. बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग

  3. तो प्रवास कसला होता

  4. प्रलय

  5. हसलो म्हणजे

RELATED POSTS

0 अभिप्राय